Pimpri News: नायजेरियातून शहरात आलेले एक आणि त्याच्या संपर्कात आलेले तिघे कोरोना पॉझिटीव्ह; ‘ओमायक्रॉन’च्या तपासणीसाठी स्वॅब ‘एनआयव्ही’कडे

एमपीसी न्यूज – नायजेरिया या देशातून पिंपरी-चिंचवड शहरात आलेल्या आणखी एका रुग्णाचा आणि त्याच्या संपर्कातील दोघांचा अशा तीन जणांचा आज (गुरुवारी) कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. ‘ओमायक्रॉन’च्या तपासणीसाठी त्यांचे स्वॅब ‘एनआयव्हीकडे’ पाठविले आहेत. नायजेरियातून शहरात आलेले तीन आणि त्यांच्या संपर्कातील तीन असे एकूण सहा जण कोरोना पॉझिटीव्ह आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय विभागाने सांगितले.

ओमायक्रॉन’ व्हेरिएंटच्या अनुषंगाने महापालिकेच्या वतीने परदेशामधून आलेल्या नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे. नायजेरिया या देशातून शहरात आलेल्या चिंचवड परिसरातील दोन मायलेकी आणि त्यांचा लहान मुलाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. ‘ओमायक्रॉन’ हा नवीन व्हेरिएंट आहे की नाही हे तपासण्यासाठी त्यांच्या घशातील द्रावाचे नमुने (स्वॅब) जिनोम सिकव्हेंसिंग करिता एनआयव्ही येथे पाठविण्यात आले आहेत. त्याचा रिपोर्ट अद्याप आला नाही.

त्यात पुन्हा नायजेरिया देशातून 25 नोव्हेंबर रोजी शहरात आलेल्या आणखी एकाचा रिपोर्ट आज कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. त्याशिवाय त्याच्या संपर्कात आलेल्या आणखी दोघांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. ‘ओमायक्रॉन’ हा नवीन व्हेरिएंट आहे का नाही हे तपासण्यासाठी त्यांच्या घशातील द्रावाचे नमुने जिनोम सिकव्हेंसिंग करिता पुणे ‘एनआयव्ही’ येथे पाठविण्यात आले आहेत.

आजपर्यंत नायजेरिया देशातून शहरात आलेले तीन आणि त्यांच्या संपर्कातील तीन अशा सहा रुग्णांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. त्यांच्यावर जिजामाता रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्या संपर्कामधील नागरिकांना गृहविलगीकरणामध्ये ठेवण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.