Pimpri news: चिंचवडमधील एका अल्पवयीन मुलाला अज्ञात इसमाने पळवले

एमपीसी न्यूज : चिंचवडमधील (Pimpri news) एका अल्पवयीन मुलाला अज्ञात इसमाने 25 जूनला पळवले. याबाबत त्या मुलाच्या आईने पिंपरी पोलिस ठाण्यात 25 जूनला अज्ञात इसमाविरोधात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी यांचा 16 वर्षांचा मुलगा पिंपरी पोलिस स्टेशन समोरील रोडवरून संध्याकाळी 7.30 वाजेच्या सुमारास कोणीतरी अज्ञात इसमाने कशाचे तरी आमिष दाखवून व फुस लावून पळवून नेले. याप्रकरणी अज्ञात इसमा विरोधात भा. द. वि. कलम 363 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात (Pimpri news) आला आहे.

Chikhali Crime : चिखलीमध्ये अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवले

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.