Pimpri News : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त नारीशक्तीचा सन्मान

एमपीसी न्यूज – जागतिक महिला दिनानिमित्त पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात विविध ठिकाणी कार्यक्रम पार पडले.जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून स्वर्गीय ज्ञानेश्वर देवकुळे सोशल फाउंडेशनच्या वतीने रावेत पोलीस चौकीत कर्तव्यावर असलेल्या महिलांना सन्मानित करण्यात आले. हा कार्यक्रम मंगळवारी (दि. 8) रावेत पोलीस चौकी येथे झाला.

यावेळी रावेत पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक परवेज शिकलगार, सामाजिक कार्यकर्ते सलीम शिकलगार, अरुण देवकुळे, तुषार देवकुळे आणि फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. डॉ. हेमंत देवकुळे उपस्थित होते.

रावेत पोलीस चौकीत कर्तव्यावर असलेल्या पोलीस अंमलदार नीता टिळेकर, अश्विनी मेहता, अर्चना धाकडे, वर्षा गोरडे, मनीषा आदमाने, सुनीता तारडे, राजश्री घोडे यांना भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

जागतिक महिला दिन भारती विद्यापीठ आय एम ई डी मध्ये साजरा

भारती अभिमत विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट (आयएमइडी )येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. भारती विद्यापीठ व्यवस्थापनशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. सचिन वेर्णेकर यांच्या हस्ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलिमा पवार, उद्योजक पूजा तहलियानी, डॉ शिवाजी इंगवले, डॉ. शिल्पा सुरेश, डॉ. संगीता शिरोडे, विषाखा दोशी यांचा सत्कार करण्यात आला .

डॉ भारती जाधव, डॉ स्वाती देसाई, डॉ सोनाली खुर्जेकर, डॉ श्रद्धा वेर्णेकर, डॉ अनुराधा येसुगडे, डॉ.रणप्रीत कौर, डॉ श्वेता जोगळेकर, डॉ हेमा मिरजी, डॉ सुजाता मुळीक, संगीता पाटील, प्रतिमा गुंड यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.