Women From Prostitution : पोलिसांनी केली वेश्याव्यवसायातून पाच महिलांची सुटका

एमपीसी न्यूज – स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्यांवर कारवाई करून पाच पीडित महिलांची अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाने सहा सप्टेंबरला सुटका केली.पिंपळे सौदागर येथील स्पा सेंटरमध्ये छापा टाकून तेथून पाच पीडित मुलींची सुटका करुन एकूण 13 हजार 140 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये अवैध धंद्यांवर प्रतिबंध करण्याच्या अनुषंगाने माहिती काढून कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते.त्यामुळे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष हे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये अवैध धंद्यावर कारवाई करण्याच्या अनुषंगाने गोपनीय माहिती काढत असताना 6 सप्टेंबरला वाकड पोलीस स्टेशन हद्दीत अवैधरित्या मुलींकडून वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

स्पा चालक-मालक सीमा धोत्रे, (वय 37, रा. नवी सांगवी) व स्पाचे मॅनेजर रमेश साहीराम (वय 24, रा. मूळ पत्ता जिल्हा गंगानगर, राज्य राजस्थान) या दोन आरोपींना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात वाकड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यि आला आहे.

या कक्षातील पोलीस अधिकारी यांना वाकड पोलीस स्टेशन हद्दीत साई सागर प्लाझा, साई चौक, जगताप डेअरी, पिंपळे सौदागर येथील कॅसल नावाच्या स्पा सेंटरमध्ये स्वतःच्या आर्थिक फायद्या करिता मुलींकडून पैशाच्या अमिष दाखवून वेश्याव्यवसाय करून घेतला जात आहे, अशी माहिती मिळाली होती.या माहितीवरून बनावट ग्राहक पाचारण करून पडताळणी करिता व त्या ठिकाणी छापा टाकून पुरुष तसेच महिला आरोपींच्या  ताब्यातून पाच पिढीत मुलींची वेश्याव्यवसायातून सुखरूप सुटका करण्यात आलेली आहे.त्यांच्याकडून 5 हजार रुपये रोख रक्कम, 140 रुपये किमतीचे इतर साहित्य, 8 हजार रुपये किमतीचा एक ओप्पो कंपनीचा मोबाईल फोन असा एकूण 13 हजार 140 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

CM EKnath Shinde : ढगफुटीसदृश्य पावसामुळे बाधित झालेल्यांना तातडीने मदत पुरविण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) डॉ.काकासाहेब डोळे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ.प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक वाहतूक प्रतिबंधक कक्षातील पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, उपनिरीक्षक प्रदीप सिंह सिसोदे,उपनिरीक्षक धैर्यशील सोळंके, उपनिरीक्षक विजय कांबळे, पोलीस अंमलदार सुनील शिरसाठ, सुधा टोके, मारुती करचुंडे, भगवंता मुठे, वैष्णवी गावडे, रेश्मा झावरे यांनी ही कारवाई केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.