Hinjawadi News : सोशल मिडीयावर कोयते हातात घेऊन फोटो टाकणाऱ्यांच्या आवळल्या मुसक्या

एमपीसी न्यूज बेकायदेशीर रित्या कोयते हातात घेऊन (Hinjawadi News) त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करत दहशत पसरवणाऱ्या दोघांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे.

आकाश दयानंद गायकवाड (वय 19 रा.सुसगाव,मुळ सोलापूर) व विजय भगवान आडे (रा.सुसगाव, मुळ परभणी) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कादेशीररित्या बंदी असताना देखील आरोपींनी हातात कोयते घेऊन फोटो काढले व ते सोशल मिडीयावर टाकून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.नागरिकांनी ही याबदद्ल पोलिसांकडे तक्रार केली होती.

आरोपींकडे कोणताही शस्त्र परवाना नसताना त्यांनी हातात कोयता घेऊन फोटो काढले व ते प्रसारीत केले. यावरून पोलिसांनी आरोपीना अटक केली असून त्यांच्याकडून दोन लोखंडी कोयते देखील जप्त केले आहेत.

Hinjawadi Crime : घरफोडी करणारी टोळी जेरबंद, 70 तोळे सोने व 8 लाख रुपये हस्तगत

ही कारवाई हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, पोलीस निरीक्षक गुन्हे सुनिल दहिफळे, सोन्याबापु देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली (Hinjawadi News) अवैध धंदे विरोधी पथक प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक अजितकुमार खटाळ, सहायक पोलीस फौजदार महेश वायबसे, पोलीस कॉन्स्टेबल संतोष डामसे, सोमवंशी पोलीस अंमलदार रवी पवार यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.