Pune : हैदराबाद ते पुणे प्रवासात महिलेवर अत्याचाराचा प्रयत्न; खाजगी ट्रॅव्हल्सच्या चालकाला अटक

एमपीसी न्यूज : हैदराबाद ते पुणे स्टेशन (Pune) या खाजगी बसमधून प्रवास करत असताना एका महिला प्रवासाचा विनयभंग करण्यात आला आहे. या बसच्या चालकानेच हा सर्व प्रकार केला. बंडगार्डन पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे. पीडित महिलेने या प्रकरणी तक्रार दिली. शेख असलम शेख अलीमउद्दीन (वय 27, रा. शरीफ नगर हैदराबाद तेलंगणा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. बस प्रवासात हा प्रकार 23 सप्टेंबर रोजी घडला.

Khadki Rape Case : Instagramवर अर्धनग्न फोटो टाकण्याची धमकी देऊन बलात्कार

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, हैदराबादच्या नामपल्ली (Pune) येथून पीडित महिला पुणे येथे येण्यासाठी शह टूर्स अँड ट्रॅव्हल्स या खाजगी बसने निघाली होती. यावेळी बस प्रवासात असताना रात्री बारा ते एकच्या सुमारास आरोपी चालक पाठीमागे आला आणि पीडित महिलेजवळ येऊन डोके दाबण्याचा बहाणा केला. त्यानंतर फिर्यादीच्या शेजारी झोपून जबरदस्तीने तिच्यासोबत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. या सर्व प्रकारानंतर फिर्यादी महिलेने सकाळी बस पुण्यात आल्यानंतर बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.