Pune Corona Update : शहरात नवीन 3 हजार 377 कोरोना रुग्णांची नोंद; 3931 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्या कमी झाल्याचे पाहायला मिळाले. शहराच्या विविध भागातील 3 हजार 377 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (सोमवारी) नोंद झाली. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 3 हजार 931 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

कोरोनामुळे शहरातील सात रुग्णांचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 9 हजार 199 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 6 लाख 09 हजार 756 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 46 हजार 302 सक्रिय रुग्ण शहरात आहेत, यामध्ये आज दिवसभरात 3 हजार 377 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नव्याने नोंद झाली.

तर, शहरात आज दिवसभरात 12 हजार 543 नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली. आजपर्यंत 42 लाख 49 हजार 507 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.

सध्या शहरात कोरोना रुग्णवाढीचा आलेख उतरता पाहायला मिळत असला तरीही नागरिकांनी स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.