Pune crime : सराईत गुन्हेगारास गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह अटक

एमपीसी न्यूज – सराईत गुन्हेगाराला मुंढवा येथून गावठी कट्टा (Pune crime) व जिवंत काडतुसासह अटक केली आहे. ही कारवाई मुंढवा पोलिसांनी मंगळवारी (दि.1) मगरपट्टा कडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या ब्रीजखाली केली.

अविनाश सुनिल जगताप (वय 29 रा.मंगळवार पेठ) असे अटक आरोपीचे नाव आहे.

PCMC News : शहरातील 10 हजार 853 सदनिकाधारकांना मिळाला पर्यावरण पूरक सवलतीचा लाभ; 55 लाखांची सवलत

तपासी पथकाला खबर मिळाली की, एकजण पिस्टलसह उभा असल्याची खबर मिळाली, त्यानुसार पोलिसांनी ब्रीजखाली उभा असलेल्या संशयीताला ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता त्याच्याकडून गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतुसे असा एकूण 17 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.(Pune crime) मुंढवा पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात बेकायदा शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल केला आहे. जगताप हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून मुंढवा पोलीस पुढिल तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.