Pune News : पुणे गांजातस्करीत अव्वल; वर्षभरात सहा कोटी 69 लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त

एमपीसी न्यूज : गेल्या वर्षभरात पुणे पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने तस्करांवर जोरदार कारवाई करून त्यांच्याकडून सहा कोटी 69 लाख रुपयांचे (Pune News) अमली पदार्थ जप्त केले आहेत. पोलिसांनी केलेल्या कारवाईत शहरात गांजा व मेफेड्रोनची (एमडी) सर्वाधिक तस्करी होत असल्याचे दिसून येत आहे.

पुण्याला ‘आयटी हब’, ‘शिक्षणाचे माहेरघर’ म्हणून ओळखले जाते. त्यामुळे या ठिकाणी नोकरी व शिक्षणाच्या निमित्ताने येणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. पुणे व परिसरात मोठ्या प्रमाणात बांधकाम प्रकल्प सुरू आहेत. यासाठी कामगार वर्गदेखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी राहतो. त्यामुळे अमली पदार्थ तस्करांना एलएसडी, कोकेन, एमडी, चरस, ब्राउन शुगरपासून ते थेट गांजा, अफूची बोंडे चुरा यासारख्यांना ग्राहक मिळतो.

कोकेन, ब्राउन शुगर विक्रीत नायजेरियाच्या व्यक्तींचा सहभाग असल्याचे दिसून येत आहे. अमली पदार्थ तस्करांवर कारवाईसाठी पुणे पोलिसांकडून अमली पदार्थविरोधी पथक एक व दोन अशी विभागणी करण्यात आली आहे. या पथकांकडून अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांची माहिती काढून कारवाई केली जाते.

Today’s Horoscope 26 December 2022 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

‘अमली पदार्थ विरोधीपथक एक’ने जानेवारी ते 15 डिसेंबरपर्यंत एकूण 65 गुन्हे दाखल केले आहेत. त्यात 89 आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून पाच कोटी 23 लाख 93 हजार रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. या पथकाने कोकेन तस्करीचे तीन गुन्हे दाखल केले असून, सहा आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन कोटी 54 लाख रुपयांचे कोकेन जप्त केले आहे. (Pune News) ब्राउन शुगरच्या विक्रीचे दोन गुन्हे दाखल करून दोन आरोपींना पकडले आहे. ‘अमली पदार्थ विरोधी पथक दोन’ने 47 गुन्हे दाखल केले असून,  70 आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून एक कोटी 45 लाख 12 हजार रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.

गांजा अमली पदार्थ पूर्वी कामगार वर्ग व पैसे जास्त खर्च करण्याची क्षमता नसलेल्या व्यक्तींमध्ये सेवन केला जात होता; पण अलीकडे इतर अमली पदार्थांमध्ये असलेल्या रासायनिक पदार्थांचा शरीरावर परिणाम होतो. हे लक्षात आल्यानंतर आरोग्याच्या बाबतीत जागरूक झाल्यामुळे अनेक उच्चशिक्षितांकडून पार्ट्यांमध्ये नशेसाठी गांजाचा वापर केला जात असल्याचे आढळून आले आहे. (Pune News) त्यामुळे यंदा गांजा विक्री करणाऱ्यांवरील कारवाईत वाढ झाली आहे. 2021 मध्ये गांजा विक्री करणाऱ्यांवर 56 गुन्हे दाखल करून 83 जणांना अटक केली होती. यंदा 64 गुन्हे दाखल करून 78 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.