Pune : ऑटोरिक्षा मीटर तपासणीचे प्रादेशिक परिवहनतर्फे आवाहन

एमपीसी न्यूज : प्रादेशिक परिवहन प्राधिकरण पुणे यांनी पुणे, पिंपरी-चिंचवड व बारामती या कार्यक्षेत्रातील तीन आसनी ऑटोरिक्षांकरिता खटुआ समितीच्या शिफारशीनुसार 1 सप्टेंबर 2022 पासून भाडेवाढ लागू केली असल्याने 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत ऑटोरिक्षांचे मीटर पुनः प्रामाणिकरण (Pune) करायचे आहे.

ऑटोरिक्षांचे मीटर पुनःप्रामाणिकरण विहित कालमर्यादेत व सुरळीतपणे पूर्ण होण्याकरिता मीटर तपासणी ट्रॅकचे विकेंद्रीकरण करण्यात आलेले आहे. अलंकार पोलीस स्टेशनसमोर, कर्वेनगर, फुलेनगर आळंदी रस्ता चाचणी मैदान, रामटेकडी इंडस्ट्रियल इस्टेट, इगलबर्ग कंपनी लेन नं.3 दिवे (पासिंग वाहने) आणि इऑन आयटी पार्कजवळ खराडी पोलीस चौकीसमोर खराडी या ट्रॅकवर तपासणी होणार आहे.

Spartan monsoon league : कल्याण क्रिकेट क्लब, स्कॉर्पियन्स् क्रिकेट क्लब संघांची विजयी कामगिरी !!

या सर्व ट्रॅकवर सकाळी 7 ते दुपारी 4 या वेळेत ऑटोरिक्षा मीटर तपासणीचे कामकाज करण्यात येणार आहे. सर्व संबंधित रिक्षाचालकांनी कॅलीब्रेशन पूर्ण झालेल्या ऑटोरिक्षा मीटर तपासणीसाठी जवळच्या ट्रॅकवर सादर कराव्यात असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी (Pune) यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.