Pimpri News : कापड दुकानात राडा घातल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – कापड दुकानात जाऊन तीन तरुणांनी मुलांनी राडा घातला. चॉपर दाखवत पैशांची मागणी केली. मुलांना प्रतिकार केला असता मुलांनी दोन कामगारांवर कोयत्याने वार केले. ही घटना सोमवारी (दि. 13) सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास पिंपरीतील डीलक्स चौक येथे मिस्टर मॅड या कापड दुकानात घडली.

कासीम अस्लम शेख (वय 26, रा. पिंपरी) यांनी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार किरण (वय अंदाजे 22, पूर्ण नाव पत्ता माहिती नाही), तुषार (वय अंदाजे 20, रा. बौद्धनगर, पिंपरी), सुमित (वय अंदाजे 24, रा. बौद्धनगर, पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरीतील डीलक्स चौक येथे मिस्टर मॅड हे कापड दुकान आहे. या दुकानात फिर्यादी काम करतात. सोमवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास तीन मुले कोयता घेऊन आली. ‘आम्हाला पैसे द्या नाहीतर येथे धंदा करू देणार नाही’ अशी त्यांनी धमकी दिली. चॉपरने फिर्यादी यांच्यावर वार केले. या हल्ल्यात फिर्यादीसह अन्य एक कामगार जखमी झाला आहे.

आरोपींनी दुकानातील डिस्प्ले काच काउंटरवर चॉपरने मारून नुकसान केले. त्यानंतर दुकानाबाहेर लावलेल्या पुतळ्याचे नुकसान केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.