Pune Crime News : वेश्या व्यवसाय गुन्ह्यात दोन वर्षापासून फरार असणाऱ्या रफिक शेखला अटक

एमपीसी न्यूज : वेश्या व्यवसायाच्या गुन्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून पसार असलेल्या आरोपीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडले. रफिक शरीफ शेख (रा. 995 बुधवार पेठ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की खंडणीविरोधी पथकाचे कर्मचारी फरार आरोपींचा शोध घेत होते. यावेळी खंडणी विरोधी पथकाचे कर्ममचारी यशवंत ओंबासे आणि रमेश चौधर यांना फरासखाना पोलीस ठाण्यात दाखल असणाऱ्या गुन्ह्यातील रफिक शेखची माहिती मिळाली. त्यानुुुसार त्याला सापळा रचून पकडले. 2019 पासूूून तो फरार होता. तो सापडत नव्हता.

ही कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप बुवा, कर्मचारी यशवंत ओंबसे, मधुकर तुपसौन्दर, रवींद्र फुलपगारे, हेमा ढेबे, रमेश चौधर, गजानन सोनवलकर यांच्या पथकाने केली आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.