Lahuji Shakti Sena : चिंचवड येथील महावीर चौकात लहुजी शक्ती सेनेचे रास्ता रोको आंदोलन

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रभर होत असलेल्या मातंग समाजावर (Lahuji Shakti Sena) हल्ल्याच्या निषेधार्थ आज (बुधवारी, दि. 18 मे) चिंचवड स्टेशन येथील महावीर चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
महावीर चौक चिंचवड स्टेशन येथील लहुजी पुतळ्यासमोर लहुजी शक्ती सेनेच्या (Lahuji Shakti Sena) कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. दोन दिवसांपासून हे कार्यकर्ते लहुजी पुतळ्याजवळ उपोषणाला बसले होते. या आंदोलनात मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते. आंदोलनाला लहुजी शक्ती सेनेचे तात्या सोनवणे, विष्णू कसबे, माजी नगरसेविका अनुराधा गोरखे, माजी नगरसेविका कमल घोलप, बापू घोलप, दीपक चखाले, नेताजी शिंदे व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यकर्त्यांनी अचानक रस्त्यावर येऊन रास्ता रोको केला. त्यानंतर सहाय्यक आयुक्त डॉ. सागर कवडे, पिंपरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना पिंपरी पोलीस ठाण्यात नेण्यात आले. पोलिसांनी खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.