Eknath Shinde : बांधकाम क्षेत्रातील सर्व परवानग्या जलदगतीने मिळाव्यात यासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचा पुढाकार

एमपीसी न्यूज : 2020 मधील तरतुदींनुसार भाडेपट्टा शुल्क भरण्यासाठी हप्त्यांची सु सिडको प्राधिकरणामध्ये एकात्मिक विकास नियंत्रण नियमावली (Eknath Shinde) लागू झाल्यामुळे त्याअंतर्गत मिळणाऱ्या परवानग्यांवरील भाडेपट्टा शुल्क भरण्यासाठी हप्त्यांची सुविधा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

तसेच सिडकोमधील बांधकाम विषयक परवानग्या जलदगतीने मिळाव्यात यासाठी सिडको प्राधिकरणाची ऑनलाईन सॅप यंत्रणा सोपी आणि सुटसुटीत करण्यासोबतच तिथे ‘ईज ऑफ डुईंग बिजनेस कक्ष’ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  नवी मुंबईतील विकासकांना भेडसावणाऱ्या अनेक समस्यांबाबत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पुढाकार घेतला असून त्याअंतर्गत सिडकोमध्ये विविध परवानग्या मिळण्यासाठी होणाऱ्या विलंबाची देखील त्यांनी दखल घेतली आहे.

सिडकोमधील कामे ही अधिक जलदगतीने व्हावीत यासाठी सिडकोची ऑनलाईन परवानग्या घेण्याची सॅप यंत्रणा अधिक सुटसुटीत आणि गतिमान करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासोबतच राज्यात बांधकामविषयक सर्व नियमांचे सुसूत्रीकरण होण्यासाठी लागू करण्यात आलेल्या युनिफाईड डीसीपीआरचे फायदे सिडकोत मिळवून देण्यात येणार आहेत.

सिडकोमध्ये यूडीसीपीआर-२०२० लागू करून त्याद्वारे मिळणाऱ्या विविध परवानग्यांवरील भाडेपट्टा भरण्यासाठी हप्त्यांची सुविधा देण्यात येणार आहे. तसेच सिडको प्राधिकरणाचा कारभार अधिक गतिमान करण्यासाठी ‘सॅप’ यंत्रणेचे सुसूत्रीकरण करणे आणि सिडकोमध्ये ‘ईज ऑफ डुईंग बिजनेस’ सेलची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचा फायदा नागरिकांना आणि विकासकांना नक्की होईल. – एकनाथ शिंदे, नगरविकास मंत्री

ऑनलाईन प्रणाली अधिक सोपी आणि ‘ईज ऑफ डुईंग बिजनेस’ प्रणाली लागू करणार

एकात्मिक विकास नियंत्रण नियमावली २०२० नुसार अतिरिक्त एफएसआय, प्रिमियम एफएसआय, टीडीआर देण्याची प्रक्रिया ऑनलाईन करणेबाबत महामंडळाने यापूर्वीच सॅप प्रणालीची अंमलबजावणी केली असून येणाऱ्या काळात ती अधिक सोपी, सुटसुटीत आणि सक्षम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Tukoba Palkhi sohala : तुकोबांच्या पालखी आगमनापूर्वी आकुर्डीतील कामे मार्गी लावण्याची ‘राष्ट्रवादी’ची मागणी

एफएसआय वापरात बदल किंवा इमारत परवानग्यांसाठी विकासकांच्या अर्जावर प्रक्रिया करताना पारदर्शकता कायम रहावी यासाठी सिडकोमध्ये ‘ईज ऑफ डुईंग बिजनेस’ सेलची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या दोन्ही निर्णयांचा फायदा सिडकोमधील मिळणाऱ्या परवानग्या अधिक पारदर्शक आणि गतीमान होण्यासाठी होणार असून, सिडको प्राधिकरणाची कार्यक्षमता वाढवण्याच्या दृष्टीने देखील त्याचा मोठा फायदा होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.