India Corona Update : चोवीस तासांत 50,407 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, 804 मृत्यू 

एमपीसी न्यूज – देशात गेल्या 24 तासांत देशभरात 50 हजार 407 नव्या रुग्णांची नोंद झाली असून, 804 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्याच्या घडीला देशाचा दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट 3.48 टक्के एवढा झाला आहे. 

आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रूग्णांची संख्या 4 कोटी 25 लाख 86 हजार 544 एवढी झाली आहे. त्यापैकी 4 कोटी 14 लाख 68 हजार 120 रूग्ण यशस्वी उपचारानंतर बरे झाले आहेत. गेल्या 24 तासांत 1,36,962 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला.  देशाचा रिकव्हरी रेट वाढून 97.37 टक्के एवढा झाला आहे.

देशातील ॲक्टिव्ह रूग्णसंख्या घटली असून, सध्या देशात 6 लाख 10 हजार 443 ॲक्टिव्ह रूग्णांवर उपचार सुरू आहेत. देशात आजवर 5 लाख 07 हजार 981 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. देशाचा मृत्यूदर 1.19 टक्के एवढा झाला आहे.

ICMR च्या आकडेवारी नुसार आजवर 74.93 कोटी प्रयोगशाळा नमुने तपासण्यात आले आहेत. गेल्या 24 तासांत 14.50 नमूने तपासण्यात आले आहेत. देशात कोरोना लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आजवर 172 कोटी 29 लाख 47 हजार 688 जणांना लस टोचण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.