Rickshaw travel : पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये रिक्षा भाडेवाढ;1 सप्टेंबरपासून अंमलबजावणी

एमपीसी न्यूज – रिक्षाचालकांनी केलेल्या मागणीनुसार प्रादेशिक परिवहन विभागाने पुण्यातील रिक्षा भाडे वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता एक सप्टेंबरपासून ही भाडेवाढ लागू होणार आहे.

या भाडेवाढीमुळे किमान भाडे 25 रुपये असणार आहे. त्यानंतर प्रत्येक किलोमीटरसाठी भाडं वाढणार आहे. त्यानुसार रिक्षात बसल्यानंतर जेव्हा मीटर सुरु होते तेव्हा आता 21 रुपयांनी सुरु होते. ते आता एक सप्टेंबरपासून 25 रुपयांनी सुरु होणार आहे. तसेच एक किमीसाठी पुणेकर सध्या 14 रुपये मोजतात ते आता 17 रुपये मोजावे लागणार आहेत.

Pune Traffic : पुणे शहरातील वाहतुक कोंडीवर मात करण्यासाठी आराखडा तयार करा – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

संपुर्ण पुणे जिल्ह्यासाठी ही भाडेवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे पुणे,पिंपरी चिंचवड आणि बारामती येथे रिक्षा भाडेवाढ लागू होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.