Corona test : चिंतेची बाब! लक्षणं असतानाही येतेय आरटीपीसीआर कोरोना टेस्ट निगेटिव्ह

एमपीसी न्यूज : कोरोना पॉझिटिव्ह  असताना आणि लक्षणं असतानाही कोरोना टेस्टमध्ये कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह येत आहेत. डॉक्टरांच्या मते 15 ते 30 टक्के रुग्णांमध्ये असं आढळून आलं आहे.

एकिकडे देशात कोरोनाची (Coronavirus) प्रकरणं झपाट्याने वाढत आहे. कोरोनाची दुसरी लाट आली आहे. त्यामुळे कोरोना लसीकरणासह कोरोना चाचण्याही (Corona test) वाढवल्या जात आहेत. सध्या कोरोना चाचणी आरटीपीसीआर टेस्टमार्फत (RT-PCR) केली जाते.

टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार आकाश हेल्थकेअरचे डॉक्टर आशिष चौधरी यांनी सांगितलं, “काही दिवसांपूर्वी असे रुग्ण आले ज्यांना ताप, खोकला होता, श्वास घ्यायाल त्रास होत होता. सिटी स्कॅनमध्ये सौम्य असे ग्रे पॅच होते, जे कोरोना संसर्गाचे संकेत देत होते. तरीदेखील त्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला”

“यापैकी काही रुग्णांची ब्रोन्कोअॅलेवलर लॅव्हेज करण्यात आलं. यामध्ये एका मार्फत तोंड किंवा नाकाची तपासणी केली जाते. यामध्ये मात्र ते रुग्ण पॉझिटिव्ह आढळले ज्यांची आरटीपीसीआर टेस्ट निगेटिव्ह होती. यातून कोरोनाव्हायरस सध्या सुरू असलेल्या टेस्टलाही धोका देण्यात सक्षम आहे”, असं डॉ. चौधरी म्हणाले.

तर इन्स्टिट्यूट ऑफ लिव्हर अँड बिलयरी सायन्सेजच्या डॉ. प्रतिभा काले म्हणाल्या, “कदाचित या रुग्णांच्या घशात किंवा नाकात तेव्हा व्हायरस नसावा. त्यामुळे त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. कोरोनाव्हायरसने कदाचित स्वतःला फुफ्फुसातील पेशींमध्ये आढळणारं प्रोटिन म्हणजे एसीई रिसेप्टरशी जो़डलं असावं. त्यामुळे जेव्हा ब्रोन्कोअॅलेवलर लॅव्हेजमध्ये फुफ्फुसातील द्रवाचा नमुना घेण्यात आला तेव्हा त्या कोरोनाव्हायरस सापडला”

मॅक्स हेल्थकेअरमधील पल्मोनोलॉजी विभागाचे प्रमुख डॉक्टर विवेक नागिया यांनी सांगितलं, “15 ते 30 कोरोना रुग्ण असे आहेत, ज्यांचा रिपोर्ट कोरोना असतानाही निगेटिव्ह आला आहे. ही एक गंभीर समस्या आहे. कारण असे रुग्ण व्हायरस मोठ्या प्रमाणात पसरवू शकतात. त्यांना नॉन कोव्हिड विभागात दाखल केलं, तर सामान्य रुग्णांना कोरोना संसर्ग होऊ शकतो”

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.