Pimpri News: ‘पावसाळ्यातील साथरोगांची काळजी घ्या’; महापालिकेचे आवाहन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. परंतु, पावसाळा सुरू झाला आहे. परिणामी, साथीचे आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. डेंग्यु, चिकुगुनिया, ताप हे रोग होण्याची शक्यता या काळात जास्त असते. या आजारांचा प्रसार वाढू नये यासाठी नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन महापालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी केले आहे.

मागील दोन वर्षे कोरोना आला आणि शहरातून साथरोग हद्दपार झाली, अशी स्थिती होती. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. पावसाळा सुरु होईल. पावसाळ्यात नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. या काळात घरातील आणि आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता ठेवणे आवश्यक आहे. लक्षणे दिसल्यास चाचणी करून उपचार सुरू करणे आवश्यक आहे. ताप हा आजार एनॉफिलस व डेंग्यु, चिकुनगुण्या हे आजार पसरवण्यास एडिस इजिप्ताय हे डास कारणीभूत असतात. ताप, डेंग्यु, चिकुनगुण्या झालेल्या व्यक्तीस डास चावला तर रोग्याच्या रक्तातील विषाणु त्या डासाच्या शरीरात शिरतात. असा विषाणुजन्य डाग निरोगी माणसास चावल्यास त्याला ताप, डेंग्यु, चिकुनगुनिया होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे या रोगाचा प्रसार थांबवायचा असल्यास एनॉफिलस व एडिस डासांच्या उत्पत्तीवर आळा घालावा लागेल.

एनॉफिलस अस्वच्छ व एडिस डासांची मादी घरात साठलेल्या स्वच्छ पाण्यावर अंडी घालते. या अंड्यातून बाहेर पडणा-या डासांच्या अळ्या त्याच पाण्यात वाढतात. 4 ते 5 दिवसानंतर या अळ्यांचे कोष बनतात. हे कोषही पाण्यातच जिवंत राहतात. कोषातून 2 दिवसांनी डास बाहेर पडतात. याचाच अर्थ डासांच्या उत्पत्तीसाठी साठलेल्या पाण्याची आवश्यकता असते. त्यामुळे पाणी साचून देऊ नयेत.

डास उत्पत्तीवर नियंत्रणासाठी हे करा!

  • घरात पाणी साठविण्याच्या सर्व भांड्यातील पाणी वापरुन रिकामी करुन कोरडी करावीत. त्यानंतर पुन्हा पाणी भरावे.
  • घरातील मोठ्या टाक्या ज्या रिकाम्या करता येणे शक्य नाही. त्यांना घट्ट झाकण बसवावे.
  • घरातील फ्लॉवर पॉट, कुलर व फ्रिजच्या खालच्या ट्रे मधील पाणी दर आठवड्यास रिकामे करावे.
  • घराच्या अंगणात किंवा गच्चीवर असलेल्या भंगाराची विल्हेवाट लावावी.
  • घराभोवतीच्या पाण्याची डबकी असतील. तर, ती बुजविणे किंवा त्याठिकाणी पाणी वाहते करावे.
  • डासांची उत्पती होते अशा ठिकाणी स्वच्छता राखणे, #मोकळ्या जागी पाणी साठू न देणे.
  • कोणतेही लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे. अंगावर दुखणे, ताप काढू नये, स्वच्छ पाणी प्यावे.

डेंग्यूची लक्षणे!

जोराचा ताप येणे, अन्नाची चव न लागणे, भूक कमी होणे, छाती आणि अवयवांवर गोवरासराखे पुरळ येणे, मळमळणे, उलट्या होणे, नाक, तोंड आणि हिरड्यातून रक्त येणे, श्वास घेताना त्रास होणे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.