Kalewadi News : तापकीरनगर मधील डांबरीकरण निकृष्ठ दर्जाचे

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने करण्यात येत असलेल्या डांबरीकरणाचा दर्जा अतिशय निकृष्ठ असून रस्त्यावर अनेक ठिकाणी पॅचेस पडले आहेत, अशी तक्रार पुणे डिस्ट्रिक्ट केमिस्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष विवेक तापकीर यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

विवेक तापकीर यांनी याप्रकरणी तक्रारीचा मेल महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना पाठवला आहे. त्यात त्यांनी डांबरीकरण निकृष्ठ दर्जाचे होत असल्याचे म्हटले आहे.

महापालिकेच्या माध्यमातून साई मल्हार कॉलनी येथील रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले होते. डांबरीकरण, दुरुस्ती करण्याची मागणी अनेक दिवसांपासून केली जात होती. मागील काही दिवसांपासून या मार्गावर रस्त्याचे डांबरीकरण करण्यात सुरुवात झाली आहे.

सुरु असलेले डांबरीकरण केवळ सुशोभीकरणासाठी केले जात आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी पॅचेस आहेत. मोठी डांबरखडी न टाकता लहान खडीचे डांबरीकरण केले जात आहे. कुठे लहान तर कुठे मोठी डांबरखडी वापरली जात आहे. यामुळे रस्त्याच्या कामाचा दर्जा ढासळला आहे.

आयुक्त राजेश पाटील यांनी स्वतः या ठिकाणी भेट देऊन डांबरीकरणाचा दर्जा पाहावा तसेच संबंधित ठेकेदाराला जाब विचारावा, अशी मागणी विवेक तापकीर यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.