Tata Nexon : रांजणगाव प्लांटमधून 3,00,000 व्या नेक्सॉनचे उत्पादन पूर्ण

एमपीसी न्यूज – वाहन निर्माण क्षेत्रात देशात आघाडीवर असलेल्या टाटा मोटर्सने रांजणगाव प्लांटमधून 3,00,000 व्या नेक्सॉनचे उत्पादन पूर्ण केले. कंपनीने गेल्या वर्षी जूनपर्यंत नेक्सॉनच्या दोन लाख युनिट्सचे उत्पादन केले. त्यानंतर केवळ आठ महिन्यात एक लाख युनिट्सचा टप्पा गाठला आहे. टाटा मोटर्सने सोमवारी (दि.28) पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

टाटा मोटर्सने SUV Nexon चे चार नवीन प्रकार देखील याप्रसंगी लॉन्च केले आहेत. दिल्लीत या नवीन प्रकारांतील कारची (पेट्रोल इंजिनसह) किंमत 11.51 लाख ते 11.58 लाख रुपये आहे. त्यांचे बुकिंग सोमवारपासून सुरू झाली असून, टाटा मोटर्सच्या सर्व अधिकृत डीलरकडे या कार्स उपलब्ध आहेत.

नेक्सॉन – भारतातील पहिली GNCAP 5 स्टार रेटेड कार पैकी एक आहे. भारतातील सर्वाधिक विकल्या जाणार्‍या 5 कारमध्ये या कारचा नेक्सॉनचा समावेश आहे. नेक्सॉनला विश्वासार्हतेसाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

टाटा मोटर्सने 2017 मध्ये Nexon SUV लाँच केली. त्याची इलेक्ट्रिक आवृत्ती Nexon EV जानेवारी 2020 मध्ये सादर करण्यात आली. कंपनीने सांगितले की 13,500 ग्राहकांसह, नेक्सॉन EV देशांतर्गत बाजारपेठेत आघाडीवर आहे आणि 62 टक्क्यांहून अधिक बाजारपेठेचा हिस्सा आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.