Pune News: 68 वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव येत्या 2 ते 6 फेब्रुवारी दरम्यान

एमपीसी न्यूज : आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित करण्यात येणारा 68 वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव दिनांक 2 फेब्रुवारी ते 6 फेब्रुवारी, 2022 या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. महोत्सव मुकुंदनगर येथील कटारिया शाळेच्या प्रांगणात संपन्न होईल.

भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या आयोजनाने व्हावी, या भावनेने या तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत. यावेळी राज्य सरकारची जी नियमावली प्रचलित असेल त्याचे पालन करून महोत्सवाचे आयोजन केले जाईल, अशी माहिती आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष व भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे सुपुत्र श्रीनिवास जोशी यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.