Pune News : हॉटेलमध्ये जेवायला घेऊन जाण्याच्या बहाण्याने ओळखीच्या व्यक्तीनेच केली घरफोडी

 पावणेदोन लाखांचा मुद्देमाल लंपास

0

एमपीसी न्यूज : हॉटेल मध्ये जेवणासाठी घेऊन जाण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीने घरफोडी करत तब्बल पावणेदोन लाखांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सरोवर हौसिंग सोसायटीत ही घटना घडली. याप्रकरणी मोहन पंढरीनाथ ढोणे (वय 63) यांनी फिर्याद दिली असून आरोपी रवींद्र शेषराव अवधूत याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. सात फेब्रुवारी रोजी आरोपीने ऊरुळी कांचन येथील हॉटेल गारवा या ठिकाणी जेवायला जाऊ असे सांगून फिर्यादी आणि त्यांच्या पत्नीला त्या ठिकाणी घेऊन गेला. त्यानंतर त्यांना त्या ठिकाणी बसवून त्यांच्या मुलांना घरी जाऊन घेऊन येतो असे सांगून निघून गेला.

_MPC_DIR_MPU_II

त्यानंतर आरोपीने आपल्याजवळ असलेल्या बनावट चावीने फिर्यादीच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत एक लाख 73 हजार पाचशे रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत. दरम्यान हा प्रकार लक्षात आल्यानंतर फिर्यादीने आरोपीकडे विचारणा केली होती.

त्यानंतर आरोपीने गुन्हा कबूल करून चोरलेली चांदीची मूर्ती परत आणून दिली होती. उरलेले दागिने परत आणून देणार असल्याचे आरोपीने सांगितले होते. परंतु त्याने ते परत न आणून दिल्यामुळे फिर्यादी यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment