India Corona Update : देशात कोरोना बाधितांची संख्या तीन कोटी, 3.90 लाख मृत्यू 

एमपीसी न्यूज – भारतात कोरोना संसर्ग झालेल्या एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या तीन कोटी झाली आहे. मागील काही दिवसांपासून देशात पन्नास हजारांच्या जवळपास नवीन रुग्ण सापडत आहेत. तर, दीड हजार मृत्यू होत आहेत. देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या तीन कोटी झाली असून मृतांची संख्या 3.90 लाखांच्या पुढे गेली आहे. 

देशात गेल्या चोवीस तासांत देशभरात 50 हजार 848 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 कोटी 00 लाख 28 हजार 7090 एवढी झाली आहे. त्यापैकी 2 कोटी 89 लाख 94 हजार 855 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. गेल्या 24 तासांत 68 हजार 817 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

देशात सध्या 6 लाख 43 हजार 194 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशातील कोरोना मृतांची संख्या 3 लाख 90 हजार 660 एवढी झाली आहे. मागील 24 तासांत 1 हजार 358 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.29 टक्के एवढा झाला आहे.

देशात आजवर 39 कोटी 59 लाख 73 हजार 198 चाचण्या पूर्ण झाल्या आहेत तर, गेल्या 24 तासांत 19 लाख 01 हजार 056 नमूने तपासण्यात आले आहेत. आयसीएमआरने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

देशात कोरोना लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत देशात 29 कोटी 46 लाख जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 54.24 लाख जणांना लस टोचण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.