Pune News : वॉकिंग करणाऱ्या डॉक्टर महिलेच्या पार्श्वभागावर चापट मारली, गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : वॉकिंग करत निघालेल्या डॉक्टर महिलेच्या पार्श्वभागावर चापट मारून विनयभंग केल्याप्रकरणी एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बी जे मेडिकल महाविद्यालयाच्या गेटवर रविवारी हा प्रकार घडला.

एका 29 वर्षीय डॉक्टर महिलेने या प्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी आरोपीविरुद्ध बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी या डॉक्टर आहेत. रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास त्या बी जे मेडिकल महाविद्यालयाच्या गेटवर असताना अज्ञात आरोपी दुचाकीवरून त्या ठिकाणी आला आणि त्याने फिर्यादी यांच्या कमरेखाली चापट मारून त्यांच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले आहे. फिर्यादीने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे. पोलीस उपनिरीक्षक जाधव अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.