Theatre Reopens : खुशखबर ! राज्यात 22 ऑक्टोबरपासून चित्रपट आणि नाट्यगृह सुरू होणार ‌

एमपीसी न्यूज – राज्यातील शाळा, धार्मिकस्थळे यांच्यापाठोपाठ आता राज्यातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. 22 ऑक्टोबर पासून राज्यभरातील चित्रपटगृहे व नाट्यगृहे सुरू होणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवास्थान ‘वर्षा’ येथे झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

कोरोना नियमांचे पालन करून चित्रपटगृहे व नाट्यगृहे सुरू करण्यास राज्य सरकारकडून परवानगी देण्यात आली आहे. यासंदर्भात सविस्तर कार्य पद्धती असणारी एसओपी तयार करण्याचे काम सुरू असून ती लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

दरम्यान, राज्यातील शाळा आणि सर्व धार्मिय स्थळे सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे आणि याच धर्तीवर आता चित्रपटगृहे, नाट्यगृहे सुद्धा सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.