Kurkumbh Industrial Estate : एमक्योर फार्मास्युटिकल्स लिमिटेडमध्ये 30 लाख किंमतीची पावडर चोरीला

एमपीसी न्यूज :  दौंड तालुक्यातील कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील (Kurkumbh Industrial Estate) एमक्योर फार्मास्युटिकल्स लिमिटेडच्या कोल्ड स्टोरेजमधून 16 जुलै ते 22 जुलै दरम्यान दोन ड्रममधील 30 लाख रुपये किमतीची 916 ग्रॅम मेल्फलन हायड्रोक्लोराईड पावडर चोरीला गेली असून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कंपनीच्या मजबूत सुरक्षा प्रणाली आणि लॉक केलेल्या कोल्ड स्टोरेजमधून चोरी कशी होते? या चोरीमुळे औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांमधील पावडर आणि केमिकल चोरीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मल्हार अपार्टमेंट, शालिमार चौक, दौड, पुणे येथील कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील मॅक्युर फार्मास्युटिकल लिमिटेड कंपनीचे अधिकारी राहुल हनुमंत मोरगावकर यांनी याप्रकरणी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

मॅक्युर फार्मास्युटिकल कंपनी औषध उत्पादनासाठी आवश्यक पावडर तयार करते. ही पावडर कंपनी API 5-Coldstorose द्वारे C. R. 1304 मध्ये तयार केली जाते. संतोषकुमार पेंटप्पा गुडेली हे कोल्ड स्टोरेजचे देखरेख, वितरण आणि व्यवस्थापन करतात.

त्यांच्या मदतीने साधन दत्तात्रय जगताप मालाचा तपशील ठेवण्याचे काम करतात. संदीप ताराचंद सोनवणे आणि मंगेश केशव लगड हे कोल्ड स्टोरेजची साफसफाई करण्यासाठी गुडेलीची चावी घेतात. 16 जुलै रोजी गुंडेली यांनी कोल्डस्टोअरच्या टेबलावर असलेल्या चाव्याने केबिनला कुलूप लावले त्यानंतर केबिनची चावी सुरक्षा विभागाकडे जमा करून ते सुट्टीवर गेले. 18 जुलै रोजी साधन जगताप कामावर आले तेव्हा कोल्डस्टोअरच्या चाव्या गायब होत्या.

Alandi News : आळंदीत दुसऱ्या दिवशीही अतिक्रमणांविरोधात कारवाई

त्यामुळे 19 जुलै रोजी नवीन चाव्या (Kurkumbh Industrial Estate) बनवण्यात आल्या. 22 जुलै रोजी सायंकाळी 7.57 च्या दरम्यान कोल्ड स्टोरेजमधील मेलफलन हायड्रोक्लोराईडमधील साहित्य साणंद येथे गुजरातला पाठवायचे होते. त्यामुळे ते कंपनीचे पर्यवेक्षक साधन दत्तात्रय जगताप, सहायक व्यवस्थापक संदीप नागनाथ बारबोल यांच्याकडे साहित्य तपासणीसाठी गेले. त्यावेळी दोन ड्रममधील 916 ग्रॅम मेल्फलन हायड्रोक्लोराईड चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली.

Pune News : जिल्हा परिषद परिसरात तिरंगा ध्वज विक्री केंद्राचा शुभारंभ

त्यावेळी 916 ग्रॅम पावडर चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले. बाजारात एका ग्रॅमची किंमत 3275 रुपये असून चोरलेल्या पावडरची किंमत 30 लाख रुपये आहे. या संदर्भात पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भादंवि कलम 454, 457 आणि 380 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक व कर्मचारी करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.