Chakan News : कुरूळी येथील दोन कंपन्यांमध्ये चोरी; 1 लाख 35 हजारांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज – खेड तालुक्यातील कुरळी येथे असलेल्या दोन कंपन्यांमध्ये अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. चोरीच्या या घटना गुरुवारी (दि. 22) पहाटे चार वाजता योग इलेक्ट्रो. प्रो.प्रा.लि आणि कृपा इंजिनिअरिंग या दोन कंपन्यांमध्ये घडल्या. दोन्ही घटनांमध्ये चोरट्यांनी एक लाख 35 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे.

याप्रकरणी योग इलेक्ट्रो कंपनीचे एचआर मॅनेजर अमोल प्रकाश भगत (वय 31, रा. देहुगाव, ता. मावळ) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अमोल भगत हे योग इलेक्ट्रो कंपनीत एचआर मॅनेजर पदावर काम करतात. त्यांच्या कंपनीच्या भिंतीला लागून असलेले खिडकीचे गज कापून अज्ञात चोरट्याने कंपनीत प्रवेश केला. कंपनीच्या दुसऱ्या मजल्यावरील काचेचा दरवाजा तोडून तसेच अकाउंटच्या केबिनच्या समोरील काचेचा दरवाजा, ड्राॅव्हरचे दरवाजे तोडून त्याचे नुकसान केले. ड्रॉवरमध्ये ठेवलेली रोख रक्कम, दोन पेन ड्राईव्ह, कंपनीची डायरी, सिक्युरिटी गार्डचा एक मोबाईल फोन असा एकूण 75 हजार रुपयांचा माल चोरी करून नेला.

त्यानंतर फिर्यादी यांच्या कंपनीच्या समोर असलेली कृपा इंजिनिअरिंग या कंपनीमध्ये देखील चोरट्यांनी चोरी केली. कंपनीच्या खिडकीला लागून असलेल्या पाइपच्या साह्याने चोरट्याने कंपनीत प्रवेश केला. कंपनी मधून वेल्डिंग मशीनचे 60 हजार रुपयांची कॉपर वाय वायर चोरट्याने चोरून नेली. दोन्ही घटनांमध्ये एक लाख 35 हजारांचा माल चोरट्याने चोरून नेला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.