India Corona Update : गेल्या 24 तासांत साडेतीन लाख नवे रुग्ण

दोन लाखांहून अधिक जणांना डिस्चार्ज   

एमपीसी न्यूज – देशात गेल्या 24 तासांत साडेतीन लाख नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. देशात सलग चौथ्या दिवशी तीन लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे दोन लाखांहून अधिक बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारी नुसार मागील 24 तासांत देशभरात तब्बल 3 लाख 49 हजार 691 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 कोटी 69 लाख 60 हजार 172 एवढी झाली आहे. त्यांपैकी 1 कोटी 40 लाख 85 हजार 110 जण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासांत 2 लाख 17 हजार 113 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

चिंताजनक बाब म्हणजे देशात सक्रिय रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून, सध्या 26 लाख 82 हजार 751 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मागील 24 तासांत 2 हजार 767 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत 1 लाख 92 हजार 311 जण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.14 टक्के एवढा आहे‌. देशाचा रिकव्हरी रेट सध्या 83.48 टक्के एवढा झाला आहे.

देशात आजवर 27 कोटी 79 लाख 18 हजार 810 नमूने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 17 लाख 19 हजार 588 चाचण्या शनिवारी (दि. 24) करण्यात आल्या आहेत. आयसीएआरने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

देशात लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत देशात 14 कोटी 09 लाख 16 हजार 417 जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे. लसीकरण सुरू झालेल्याला देशात 99 दिवस पूर्ण झाले असून, 99 दिवसांत 14 कोटी लोकांचे लसीकरण करणारा भारत जगातील पहिला देश ठरला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.