Chikhali Crime News : मासे विक्रेत्याकडे हप्ता मागत खुनी हल्ला; तिघांना अटक

एमपीसी न्यूज – चार जणांनी मिळून एका मासे विक्रेत्याकडे हप्ता मागितला. सुरुवातीला काही रक्कम मासे विक्रेत्याने आरोपींना दिली. मात्र दरमहा हप्ता मागितल्यानंतर विक्रेत्याने नकार दिला. त्यावरून चार जणांनी मिळून मासे विक्रेत्यावर प्राणघातक हल्ला केला. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. ही घटना 28 नोव्हेंबर आणि 7 डिसेंबर रोजी चिखली परिसरात घडली.

आकाश शिनगारे, संग्राम पवार, रोहित जुजगर, दिनेश कोळी अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. त्यातील आकाश संग्राम आणि दिनेश या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी विशाल लालू राठोड (वय 23, रा. चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे मासे विक्रीचे दुकान आहे. कृष्णानगर, भाजी मंडई चौकात ते मासे विकतात. 28 नोव्हेंबर रोजी आरोपी फिर्यादी यांच्या दुकानात आले. त्यांनी फिर्यादीकडे पैसे मागितले. पैसे न दिल्यास ठार मारण्याची धमकी दिली. त्यामुळे फिर्यादी यांनी 900 रुपये काढून दिले. त्यानंतर चार पाच दिवसांनी आरोपी पुन्हा फिर्यादी यांच्या दुकानावर आले आणि दार महिन्याला हप्ता देण्याची मागणी केली. त्यासाठी फिर्यादी यांनी नकार दिला.

‘ तू जिथं दिसशील तिथंच संपवतो’ अशी धमकी देऊन आरोपी निघून गेले. 7 डिसेंबर रोजी रात्री अकरा वाजता फिर्यादी रस्त्याने जात असताना आरोपी संग्राम याने फिर्यादी यांना थांबवुन पुढे सोडण्यास सांगितले. फिर्यादी यांनी त्यासाठी देखील नकार दिला. त्यामुळे संग्राम याने त्याच्या अन्य साथीदारांना बोलावून फिर्यादी यांना मारहाण केली. फिर्यादी यांच्या डोक्यात फरशी मारून त्यांच्यावर खुनी हल्ला केला. फिर्यादी यांच्या आईने भांडणात पडून त्यांना वाचवले. ‘तू परत भेटला तर तुझं कामच संपवतो’ अशी धमकी दिली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

परस्पर विरोधात गुन्हा दाखल

या प्रकरणी परस्पर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संग्राम दत्तात्रेय पवार (वय 23, रा. चिखली) यांनी फिर्याद दिली आहे. विशाल लालू राठोड (वय 23), किरण लालू राठोड (वय 23, दोघे रा. चिखली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

फिर्यादी हे मेसमधून जेवण करून घरी जात असताना स्वप्ननगरी सोसायटी जवळ रस्त्याच्या बाजूला फिर्यादी यांचा मित्र मयूर चव्हाण आणि विशाल राठोड हे दोघेजण दारू पीत बसले होते. फिर्यादी यांनी मयूर चव्हाण याला ‘मला घरी सोड’ असे सांगितले. त्यावेळी आरोपी विशाल आणि किरण या दोघांनी मिळून फायरडी यांना शिवीगाळ करत मारहाण करून काठीने डोक्यात मारून जखमी केले. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.