Chakan Crime News : लग्नाच्या वरातीत गाणी लावण्यावरून एकावर वार

एमपीसी न्यूज – लग्नाच्या वरातीत गाणी लावण्याच्या कारणावरून तिघांनी मिळून एकावर धारदार शस्त्राने वार केले. ही घटना शुक्रवारी (दि. 13) रात्री दहा वाजता धामणे फाटा पाईंट येथे घडली.

योगेश संजय डांगले (वय 28, रा. धामणे फाटा, पाईट) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विकास रामभाऊ आवारी (वय 19, रा. देवतोरणे, ता. खेड), दीपक, प्रसाद कलवडे (दोघे रा. पराळे, ता. खेड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नाच्या वरातीत गाणी लावण्याच्या कारणावरून आरोपी विकास याने त्याच्याकडील चाकू सारख्या धारदार शस्त्राने फिर्यादीवर वार केले. त्याच्या दोन साथीदारांनी फिर्यादी यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. विकास आवारी याला पोलिसांनी अटक केली आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.