Chakan and Nigdi : चाकण आणि निगडीमध्ये तीन घरफोडी; साडेतीन लाखांचा ऐवज चोरीला

एमपीसी न्यूज – चाकण (Chakan and Nigdi) येथे घरफोडी झाली, तर निगडी येथे दोन दुकाने फोडल्याच्या घटना उघडकीस आल्या. याप्रकरणी गुरुवारी (दि. 26 मे) अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

हेमाकांत बाबुराव दराडे (वय 28, रा. चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील सामान अस्ताव्यस्त फेकून लोखंडी कपाटाच्या तिजोरीचे कुलूप तोडून दोन लाख 85 हजार रुपये रोख रक्कम चोरट्याने चोरून नेली. ही घटना 21 मे पहाटे पाच ते 26 मे सकाळी पावणे नऊ वाजताच्या कालावधीत घडली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

पंकज अमरजित सचदेवा (वय 35, रा. देहूरोड) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचे ट्रान्सपोर्ट नगर येथे शालिमार ऑटो इलेक्ट्रिकल्स हे दुकान आहे. 25 मे रात्री आठ ते 26 मे पहाटे साडेपाच वाजताच्या कालावधीत अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या दुकानाचे शटर उचकटून दुकानातून 52 हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली.

Car theft Bhosari : कारची काच फोडून कागदपत्रे आणि रोकड चोरीला

भूपेंद्रसिंग देवीसिंग शेखावत (वय 44, रा. निगडी प्राधिकरण) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचे निगडी प्राधिकरण येथे जनता गॅरेज हे दुकान आहे. 26 मे रोजी मध्यरात्री साडेबारा ते सकाळी साडेसहा वाजताच्या कालावधीत अज्ञात चोरट्याने गॅरेजचे शटर उचकटून आत प्रवेश केला. गॅरेजमधून 13 हजार 700 रुपयांचा माल आणि दोन हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 15 हजार 700 रुपयांचा ऐवज चोरून नेला. निगडी पोलीस (Chakan and Nigdi) तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.