Vehicle theft : चाकण, भोसरी, चिखलीतून तीन दुचाकी एक टेम्पो चोरीला

एमपीसी न्यूज – चाकण, भोसरी आणि चिखली परिसरात चार वाहनचोरीच्या घटना उघडकीस आल्या आहेत. त्यामध्ये तीन दुचाकी तर एका घटनेत टेम्पो चोरीला गेला आहे. याप्रकरणी बुधवारी (दि. 15) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

आशिष उमेशचंद्र सेन (वय 37, रा. चिखली) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांची 25 हजार रुपये किमतीची पल्सर दुचाकी अज्ञात चोरट्यांनी निघोजे येथील ओम लॉजिस्टिक समोरून चोरून नेली. ही घटना 13 डिसेंबर रोजी सकाळी पावणे दहा ते रात्री सव्वासात वाजताच्या कालावधीत घडली.

सिद्धार्थ रवींद्र दिवटे (वय 25, रा. पिंपळे गुरव) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांची 40 हजार रुपये किमतीची दुचाकी बुधवारी (दि. 15) मध्यरात्री बारा वाजता एमआयडीसी भोसरी मधील युनिटी टूल्स अँड गेजेस प्रा ली या कंपनीत पार्क केली. रात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली. हा प्रकार सकाळी नऊ वाजता उघडकीस आला.

सतीश शांताराम कुदळे (वय 36, रा. महात्मा फुले नगर, चिंचवड) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांची 12 हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरासमोरून चोरून नेली. हा प्रकार मंगळवारी (दि. 14) रात्री पावणे दहा ते बुधवारी (दि. 15) सकाळी दहा वाजताच्या कालावधीत घडला.

प्रशांत सूर्यभान शिरगुरे (वय 35, रा. भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी त्यांचा एक लाख 80 हजार रुपये किमतीचा टेम्पो 13 डिसेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजता भोसरी आळंदी रोडवरील गव्हाणे पेट्रोल पंप येथे पार्क केला. रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांचा टेम्पो चोरून नेला. 14 डिसेंबर रोजी पहाटे पाच वाजता हा प्रकार उघडकीस आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.