Hinjawadi Crime News : मंगलकार्यालयातून सव्वादोन लाखांचा ऐवज असलेली पर्स चोरीला

एमपीसी न्यूज – नातेवाईकांच्या लग्नासाठी मंगल कार्यालयात गेलेल्या महिलेची पर्स अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. पर्समध्ये दोन लाख 22 हजारांचा ऐवज होता. ही घटना 7 बावधन येथील मुहूर्त लॉन्स येथे घडली.

सीमा हंबीरराव आडनाईक (वय 40, रा. सहकारनगर, पुणे) यांनी याप्रकरणी बुधवारी (दि. 15) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांच्या घरातील मंडळी 7 डिसेंबर रोजी रात्री बावधन येथील मुहूर्त लॉन्स येथे नातेवाईकाच्या लग्नासाठी गेल्या होत्या. रात्री पावणे नऊ ते साडेनऊ वाजताच्या कालावधीत अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांची पर्स चोरून नेली. त्यामध्ये सोन्याचे दागिने, रोख रक्कम, पैसे असा एकूण दोन लाख 22 हजारांचा ऐवज होता. हिंजवडी पोलीस याप्रकरणी तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.