Chakan Crime News : रिक्षाला लावली बनावट नंबर प्लेट, 18 खटले दाखल 4,800 रूपयांचा दंड

एमपीसी न्यूज  – रिक्षाला बनावट नंबर प्लेट लावत नियमांचे उल्लंघन करून तब्बल 18 खटले आणि त्यासाठी 4 हजार 800 रूपयांचा दंड निर्माण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 16 सप्टेंबर 2019 ते 20 सप्टेंबर 2021 दरम्यान निघोजे, ता. खेड, पुणे याठिकाणी हा प्रकार घडला. याप्रकरणी दोघांना चाकण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

विशाल प्रकाश गावडे (वय 25, रा. निगडी, मुळगाव सोलापूर) आणि महेश जालिंदर उदागे (रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे दोन्ही अटक आरोपींची नावे आहेत.

याप्रकरणी अफजल युसुफ शेख (वय 41, रा. मंहमंदवाडी, हडपसर) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने एमएच 12 क्यु आर 5176 ही नंबर प्लेट रिक्षाला लावून गैरवापर केला. तसेच, वाहतूक नियमांचे उल्लंघन करत 18 खटले निर्माण करत 4 हजार 800 रूपयांचे दंड निर्माण केला व शासनाची मदत फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आरोपींना ताब्यात घेतले असून, चाकण पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.