Pimpri News : लिवायज कंपनीच्या वस्तूंची विक्री, कॉपीराइट ॲक्ट अंतर्गत दोन दुकानदारांना अटक 

एमपीसी न्यूज – लिवायज कंपनीच्या वस्तू विना परवानगी विक्रीसाठी ठेऊन कॉपीराइट ॲक्टचा भंग केला. याप्रकरणी पिंपरीतील दोन दुकानदारांना अटक केली आहे. जयशंकर ट्रेडर्स आणि ममता बॅग हाऊस या दोन दुकानांवर शुक्रवारी (दि.22) पिंपरी पोलिसांनी ही कारवाई केली. 

देवराम सखाराम चौधरी (वय 25) आणि नाथाराम हथनाराम भाटी (वय 38) (दोघेही रा. रिव्हर रोड, पिंपरी) असे दोन्ही अटक आरोपींची नावे आहेत.

याबाबत सिद्धेश सुभाष शिर्के (वय 29, रा. जोगेश्वरी, पुर्व मुंबई) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी जयशंकर ट्रेडर्स आणि ममता बॅग हाऊस या दोन दुकानात लिवायज कंपनीच्या वस्तू विना परवानगी विक्रीसाठी ठेवल्या होत्या. कॉपीराइट ॲक्टचा भंग केल्याप्रकरणी दोन्ही दुकानदारांना अटक केली आहे. पिंपरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.