Nigdi News : सोसायटीच्या पार्किंग मधून दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज – सोसायटीच्या पार्किंग मध्ये पार्क केलेली दुचाकी चोरट्यांनी चोरून नेली.(Nigdi News) ही घटना मंगळवारी (दि. 22) सकाळी ओटास्कीम, निगडी येथे उघडकीस आली.

चंद्रकांत महादेव कुद्रे (वय 29, रा. ओटास्किम निगडी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Bhosari Crime : मुलीच्या विनयभंगाचा जाब विचारणाऱ्या वडिलांना मारहाण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांची 35 हजार रुपये किमतीची दुचाकी त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये सोमवारी रात्री दहा वाजता पार्क केली.(Nigdi News) रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी दुचाकीचे लॉक तोडून दुचाकी चोरून नेली. मंगळवारी सकाळी नऊ वाजता हा प्रकार उघडकीस आला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.