Ramdas Athawale On CM Thackeray: उद्धव ठाकरे यांच्यात पंतप्रधान होण्याची धमक नाही- रामदास आठवले

Uddhav Thackeray has no strength to be PM says union minister ramdas athawale त्यासाठी संपूर्ण देशात पक्ष असावा लागतो. महाराष्ट्रातील 18 खासदारांच्या जिवावर देशाचा पंतप्रधान होणे अशक्य आहे.

एमपीसी न्यूज- पंतप्रधान होण्याची केवळ इच्छा असून चालत नाही, तर त्यासाठी तेवढी ताकदही लागते. उद्धव ठाकरे यांच्यात ती ताकद नाही, असे स्पष्ट मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ते राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होणार असल्याबाबत सध्या चर्चा सुरु आहेत. यावर आठवले यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आज उद्धव ठाकरे आमच्यासोबत असायला हवे होते असे टि्वट केले. तसेच उद्धव ठाकरे यांच्या राष्ट्रीय राजकारणातील प्रवेशाबाबतही परखड मत मांडले.

आठवले हे नवी मुंबईतील वाघवली गावात बुद्ध लेण्यांची पाहणी करण्यासाठी आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्यात पंतप्रधान होण्याची धमक नाही. ते मुख्यमंत्री आहेत. पण ते पंतप्रधान होणे अशक्य आहे. त्यासाठी संपूर्ण देशात पक्ष असावा लागतो. महाराष्ट्रातील 18 खासदारांच्या जिवावर देशाचा पंतप्रधान होणे अशक्य आहे.

दरम्यान, शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’मधील अग्रलेखात उद्धव ठाकरे यांनी आता राष्ट्रीय राजकारणाचे नेतृत्व करावे असे म्हटले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना रामदास आठवले यांनी उद्धव ठाकरे यांच्यात तेवढी ताकद नसल्याचे म्हटले.

आपल्या टि्वटमध्ये त्यांनी म्हटले की, शिवशक्ती भीमशक्तीच्या प्रयोगाला शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी हिरवा कंदील दाखविल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यात योगदान दिले. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. ते आज आमच्या सोबत असायला हवे होते याची खंत वाटत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.