Union Budget 2022 : लोकसभेत आर्थिक वर्ष 2022 – 23 अर्थसंकल्प सादर; काय स्वस्त काय महागले?

एमपीसी न्यूज – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज (दि. 1 फेब्रु.) लोकसभेत चौथा अर्थसंकल्प सादर केला. यावर्षीच्या अर्थसंकल्पात अनेक घोषणा करण्यात आल्या असून महागाईने त्रस्त सर्वसामान्यांना यातून काहीसा दिलासा देण्यात आला आहे. यामध्ये मोबाईल फोन, चार्जर, कॅमेरा लेन्स तसेच इलेक्ट्रीक वस्तूंसह कपडे आणि चामड्याच्या वस्तू स्वस्त होणार आहेत. यंदा बळीराजाला ध्यानात ठेऊन कृषी क्षेत्राला अर्थसंकल्पात मोठा दिलासा देण्यात आला आहे, तर कोरोना संकटाचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोग्य विभागासाठी सुद्धा अर्थसंकल्पात मोठी तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान, नोकरदार वर्गाची मात्र यावेळी सुद्धा निराशाच झाली आहे.

कोणत्या गोष्टी झाल्या स्वस्त – 

  • चामडे
  • बूट
  • चपला
  • विदेशी सामान
  • कपडे
  • शेती संबंधीत वस्तू
  • पॅकेजिंगचे डब्बे
  • पाॅलिश केलेले डायमंड
  • परदेशी छत्र्या
  • मोबाईल फोन
  • मोबाईल चार्जर
  • जेम्स, ज्वेलरी

काय महागले – 

कॅपिटल गूड्सवर आयात शुल्कावरील सूट रद्द करण्यात आली असून त्यावर 7.5 टक्के आयात शुल्क आकारण्यात येणार आहे.

दरम्यान, अर्थमंत्री सीतारमण यांनी काही केमिकल्सवरील कस्टम ड्यूटी कमी करणार असल्याचे सांगितले. यामध्ये मिथेनाॅलचा समावेश आहे. स्टिल स्क्रॅपवरील कस्टम ड्युटीवरही सूटमध्ये एक वर्षाची वाढ मिळाली आहे तसेच जेम्स अँड ज्वेलरीवरील कस्टम ड्युटी सुद्धा 5 टक्क्यांनी कमी करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.