Uttamnagar Police : शिऱ्या वाघमारे व टोळीवर मोक्का अतंर्गत कारवाई

एमपीसी न्यूज – रेकॉर्डवर असणाऱ्या शिऱ्या वाघमारे व त्याच्या टोळीवर उत्तमनगर (Uttamnagar Police) पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे.

गणेश ऊर्फ शिऱ्या वाघमारे (वय 21 रा. शिवणे) हा टोळी प्रमुख असून त्याचे साथीदार सचिन शंकर दळवी (वय 23 रा.वारजे), सुरज राजू मारुडा (वय 21 रा. वारजे), रखमाजी परमेश्वर जाधव (वय 19 रा. वारजे माळवाडी), प्रतिक संजय नलावडे (वय.21 रा. वारजे), समीर ऊर्फ अरब्या नरहरी कांबळे (वय.18 रा. उत्तमनगर) अशी अठक आरोपींची नावे आहेत.

Vilas Madigeri : चार सदस्यीय प्रभागरचनेची अंमलबजावणी करावी

शिऱ्या व त्याच्या साथीदारांवर उत्तमनगर पोलीस (Uttamnagar Police) ठाण्यात खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासात या टोळीवरील शस्त्र बाळगणे, परिसरात दहशत पसरवीणे, चोरी, मारामारी, सार्वजनीक मालमत्तेचे नुकसान करणे, खूनाचा प्रयत्न करणे असे गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. याचा पुढिल तपास उत्तमनगर पोलीस करीत असून उत्तमनगर पोलिसांनी मोक्का अंतर्गत केलेली ही 28 वी कारवाई आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.