Pune Crime Branch : पुणे गुन्हे शाखेने सराईत गुन्हेगाराला केली रंगेहात अटक

एमपीसी न्यूज – रेकॉर्डवरील (Pune Crime Branch) सराईताला बेड्या ठोकत त्याच्यावरील 16 गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. हि कारवाई पुणे आयुक्तालयाच्या गुन्हेशाखा पाचने केली आहे.

अक्षयसिंग बिरुसिंग जुनी (वय 19, हडपसर) असे अटक आरोपीचे नाव आहे. तो वाहन चोरी करून घरफोडीच्या तयारीत होता. त्याच्यावरील 14 गुन्हे हे पुणे आयुक्तालया अंतर्गत तर 2 पिंपरी-चिंचवड आयुक्तालयांतर्गत दाखल असल्याचे समोर आले आहे.

Uttamnagar Police : शिऱ्या वाघमारे व टोळीवर मोक्का अतंर्गत कारवाई

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी अक्षयसिंग याला चोरी केलेल्या दुचाकीसह अटक केली. अधिक चौकशी केली असता त्याच्यावरील वानवडी, बंडगार्डन, हडपसर, इंदापूर, लोणी काळभोर, मुंढवा, लष्कर पोलीस ठाणे, मार्केटयार्ड तसेच पिंपरी-चिंचवड आयुक्तालय येथील असे एकूण 16 गुन्हे उघडकीस आले आहेत. यावेळी त्याच्याकडून पोलिसांनी 4 चारचाकी, 6 दुचाकी अशी 10 वहाने तर पाच (Pune Crime Branch) घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहे. पोलिसांनी यावेळी 19 लाख 95 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.