Vehicle Theft News : वाहन चोरट्यांचा शहरात धुमाकूळ; वाहन चोरट्यांना पकडण्यात पोलीस अपयशी

चाकण, चिखली, वाकड मधून तीन वाहने चोरीला

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात वाहनांची चोरी सर्वसाधारण बाब बनली आहे. दररोज सरासरी सात वाहने चोरीला जात आहेत. वाहन चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना मात्र अपयश येत असून चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. दरम्यान, मंगळवारी (दि. 16) चाकण, चिखली आणि वाकड मधून तीन दुचाकी वाहने चोरीला गेल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत.

जानेवारी महिन्यात 126 वाहने चोरीला गेली. तर फेब्रुवारी महिन्यात 96 वाहने चोरीला गेली आहेत. दोन महिन्यात तब्बल 222 वाहने चोरीला गेली असून त्यात 204 दुचाकी, 4 तीनचाकी आणि 14 चारचाकी वाहनांचा समावेश आहे. यातील केवळ 21 वाहने शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. हे प्रमाण केवळ 9 टक्के असून 91 टक्के वाहने अजूनही पोलिसांना सापडलेली नाहीत.

दरम्यान, चाकण, चिखली आणि वाकड मधून प्रत्येकी एक दुचाकी चोरीला गेल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. माणिक दत्तू पवार (वय 46, रा. खराबवाडी, चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांची एम एच 14 / ई के 4237 ही 20 हजारांची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराजवळून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे.

विशाल श्रीमंत जगदाळे (वय 28, रा. चिंचेचा मळा, चिखली) यांची 30 हजारांची दुचाकी (एम एच 25 / ए आर 0364) त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमधून चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर आकाश अर्जुन शिंदे (वय 27, रा. थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांची 15 हजारांची दुचाकी काळेवाडी येथील धनगर बाबा मंदिरासमोरून चोरट्यांनी चोरून नेली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.