Veteran Actor Ramesh Dev Passes Away : ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे निधन

एमपीसी न्यूज – एकेकाळी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारे, अनेकांचे लाडके ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे ह्रदयविकाराच्या धक्क्याने आज (दि. 02 फेब्रु) निधन झाले. ते 93 वर्षांचे होते. चार दिवसांपूर्वीच त्यांनी त्यांचा 93 वा वाढदिवस साजरा केला होता. 

मुंबईतील धीरूभाई अंबानी रुग्णालयात रमेश देव यांनी आज अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाचे वृत्त त्यांचा मुलगा आणि अभिनेता अजिंक्य देव यांनी दिले.

अगदी वयाच्या 93 व्या वर्षापर्यंत हा उत्साहाचा झरा कायमच वाहताना दिसला मात्र आज ह्रदयविकाराच्या झटक्याने तो कायचाच शांत झाला. देव यांच्या अचानक निघून जाण्याने सिनेसृष्टीत मोठी पोकळी निर्माण झाली असल्याचे म्हणत अनेक दिग्गज कलाकारांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांच्याविषयी थोडेसे…

रमेश देव यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांत काम केले आहे. पत्नी सीमा देव यांच्यासोबतचे त्यांचे चित्रपट त्यावेळी चांगलेच गाजले. एक काळ गाजवणारे अभिनेते रमेश देव यांनी आतापर्यंत 280 पेक्षा जास्त चित्रपटांत काम केले आहे. देव यांनी ‘अंधाला मगटो एक डोला’ (1956) या चित्रपटातून करमणूक उद्योगात पदार्पण केले. ‘आरती’ हा त्यांचा पहिला बॉलिवूड चित्रपट. अभिनेते  रमेश देव अजूनही ‘आनंद’ आणि ‘तकदीर’ या चित्रपटातील भूमिकेसाठी ओळखले जातात.

अभिनेते रमेश देव यांना 2013 मधील 11 व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (पीआयएफएफ) लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड देऊन गौरवण्यात आले आहे.

रमेश देव यांच्या सिनेमांवर एक नजर – 

  • घायल पुन्हा एकदा
  • चंदी (2013)
  • जॉली एलएलबी
  • पिपानी (2012)
  • राज का रण (2011)
  • जेता (2010)
  • गोश्ता लग्नांतर्ची (2010)
  • टिन्हिसंजा
  • हौन जा दे!
  • विघ्नहर्ता … श्री सिद्धिविनायक
  • गलगले निघाले
  • वासुदेव बळवंत फडके (2007)
  • उल्फत की नायी मंजिलेन (1994)
  • निश्चय (1992)
  • घायाळ
  • प्रतिबंध
  • अजाद देश के गुलाम
  • तुफान (1989)
  • घराना (1989)
  • जनम जनम
  • खेल मोहब्बत का
  • मिस्टर इंडिया (1987)
  • औलाद (1987)
  • इनाम दस हजारा (1987)
  • डाकू हसीना (1987)
  • मेरा हक (1986)
  • अल्लाह राखा (1986)
  • काला धंदा गोरे लॉग (1986)
  • प्यार किया है प्यार करेंगे (1986)
  • इल्जाम (1986)
  • हम नौजवान (1986)
  • कर्मयुध (1985)
  • कभी अजनाबी द (1985)
  • एक चिट्टी प्यार भरा (1985)
  • ग्रहस्थी (1985)
  • हम दो हमारा दो (1985)
  • लैला (1984)
  • हेच माझा माहेर (1984)
  • ताकदीर (1983)
  • बायको असवी आशी (1983)
  • खुड-दार (1982)
  • श्रीमान श्रीमती (1982)
  • हातकडी (1982)
  • चंबल के डाकू (1982)
  • दुल्हा बिका है (1982)
  • दहशत (1981)
  • फाटकडी (1980)
  • नाईट बाय बॉम्बे
  • दादा
  • महाविद्यालयीन मुलगी (1978)
  • अंजना में (1978)
  • हीरालाल पन्नालाल (1978)
  • हीरा और पत्थर (1977)
  • जादू टोना (1977)
  • जय गणेश (1977)
  • ये है जिंदगी (1977)
  • रईस (1976)
  • नाग चंपा (1976)
  • आखरी दाव (1975)
  • एक महल हो सप्नो का (1975)
  • ओवल्टे भाऊराया (1975)
  • राणी और लालपरी (1975)
  • प्रेम नगर (1974)
  • कोरा कागझ (1974)
  • ३६ घंटे (1974)
  • गीता मेरा नाम (1974)
  • हम जंगल हैं (1973)
  • धर्म (1973)
  • काश्मकाश (1973)
  • बन्सी बिरजू (1972)
  • बीस साल पेहले (1972)
  • जोरू का गुलाम (1972)
  • कोशिष (1972)
  • लालकर (1972)
  • मानवता (1972)
  • रामपूर का लक्ष्मण (1972 )
  • ज़मीन आसमान (1972)
  • संजोग (1972)
  • बॅन फूल (1971)
  • हुल्चुल (1971)
  • लाखों में एक (1971)
  • मेरे आपने (1971)
  • आनंद (1971)
  • मस्ताना
  • जीवन मृत्यु
  • खिलोना
  • दर्पण
  • मुजरीम
  • शार्ट
  • सरस्वती चांदारा (1968)
  • शिकार (1968)
  • चिमुकला पाहुना (1967)
  • मेहरबान (1967)
  • स्वप्ना टेक लोचानी (1967)
  • दस लाख (1966)
  • गुरुकिल्ली (1966)
  • प्रेम आणि खून (1966)
  • शेवाचा मालुसुरा (1965)
  • पडछाया (1964)
  • माझा होशील का? (1963)
  • आरती (1962)
  • भाग्य लक्ष्मी (1962)
  • वरदक्षिना (1962)
  • माझी आई (1961)
  • सुवासिनी (1961)
  • जगाचार्य पाठीवार (1960)
  • पैशाचा पाउस (1960)
  • उमाज पडेल तार (1960)
  • साता जन्माची सोबती (1959)
  • देवघर (1956)
  • गथ पडली थाका थाका (1956)
  • अंधळा मगटो एक डोला (1955)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.