Jayant Pawar Passed Away : ज्येष्ठ लेखक आणि नाटककार जयंत पवार यांचे निधन

एमपीसी न्यूज : साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक आणि नाटककार जयंत पवार यांचे आज रविवारी (29 ऑगस्ट) पहाटे निधन झाले. जयंत पवार यांना रात्री अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

जयंत पवार यांनी अधांतर, टेंगशेच्या स्वप्नात ट्रेन (दीर्घांक), दरवेशी (एकांकिका), पाऊलखुणा (वंश या नाटकाचे व्यावसायिक रूप), बहुजन संस्कृतिवाद आणि लेखक (भा़ाषाविषयक), माझे घर अशी अनेक नाटकं लिहिली.

जयंत पवार यांना ‘फिनिक्सच्या राखेतून उठला मोर’ या कथासंग्रहासाठी 2012 सालचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. ‘काय डेंजर वारा सुटलाय’ या त्यांच्या नाटकाला महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार मिळाला.

2014 साली महाड येथे झालेल्या 15 व्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या साहित्य संमेलनाचे जयंत पवार अध्यक्ष होते.

पवार यांच्या ‘अधांतर’ या नाटकावर ‘लालबाग परळ’ हा मराठी चित्रपट बनविण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.