Wakad : बनावट कागदपत्रे बनवून बंगला विकण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज – बंगला विकण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करून बंगला विकण्याचा प्रयत्न करत फसवणूक केली. हा प्रकार सन 2017 ते 1 ऑक्टोबर 2022 या कालावधीत पार्क स्ट्रीट वाकड (Wakad) येथे घडला.

निलेश शांताराम पाटील (वय 43, रा. नाशिक) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमित राजेंद्र गुप्ता (रा. यूएसए) आणि एक महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Waki Phata : वाकी फाटा येथे पिस्टलसह तरुणास अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पार्क स्ट्रीट वाकड येथील डायमंड पार्क (Wakad) हाऊसिंग सोसायटीमध्ये असलेल्या बंगला क्रमांक 21 या मिळकतीबाबत आरोपी आणि धीरज चंचलाणी यांचा वाद सुरु आहे. तरीही आरोपींनी फिर्यादीस कोणतेही वाद सुरु नसल्याचे सांगत, कोणताही मेंटेनन्स बाकी नसून सर्व कागदपत्र क्लिअर आहेत असे भासवले. सोसायटीची एनओसी मिळण्यासाठी आरोपींनी इंडेमिनीती बॉण्ड तयार करून फिर्यादींची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.