Pune News : ‘माझ्या मैत्रिणीसोबत चॅटींग का करतोस…?’, महाविद्यालयीन तरुणांकडून एकाला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज : मैत्रिणी सोबत चॅटींग का करतोस असा जाब विचारत 3 तरुणांनी एका महाविद्यालयीन तरुणाला बेदम मारहाण केली. गरवारे महाविद्यालय जवळ असलेल्या पुणे सेंट्रल मॉल जवळ शनिवारी ही घटना घडली. डेक्कन पोलिस ठाण्यात या प्रकरणी सुरज दत्ता थोरात (रा. भुगाव)  आणि त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनू माणिक खराडे (वय 19) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी सोनू आणि तरुणी शालेय जीवनापासूनचे मित्र आहेत. महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर या मुली सोबत आरोपी सुरज याची देखील मैत्री झाली होती. दरम्यान या मुलीसोबत ओळख झाल्यानंतर सुरज थोरात याने सोनू बरोबर चॅटिंग करू नकोस असे अनेकदा या मुलीला सांगत होते. परंतु सोनू माझा शाळेपासूनचा मित्र आहे मी त्याला भाऊ मानते असे सांगून ही तरुणी त्याच्यासोबत चॅटिंग करतच राहिली.

याच रागातून सुरज थोरात याने सोनूला गरवारे महाविद्यालय जवळ असलेल्या सेंट्रल मॉल या ठिकाणी भेटायला बोलावले. त्यानंतर माझ्या मैत्रिणी सोबत चॅटिंग करतो असे म्हणत लोखंडी रॉडने डोक्यात हातावर पायावर आणि पाठीत मारहाण केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.