India Corona Update : देशात 1.88 लाख सक्रिय रुग्ण, गेल्या 24 तासांत 18,599 नव्या रुग्णांची नोंद 

एमपीसी न्यूज – देशात नव्यानं वाढ होणा-या रुग्णांची संख्या वाढत असल्याने सक्रिय रुग्णांची संख्या देखील वाढत आहे. देशात सध्या 1.88 लाख सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मागील 24 तासांत देशभरात 18 हजार 599 नव्या कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे तर, 97 रुग्णांचा मृत्यू झाला. 

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 कोटी 12 लाख 29 हजार 398 एवढी झाली आहे. त्यापैकी 1 कोटी 08 लाख 82 हजार 798 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. गेल्या 24 तासांत 14 हजार 278 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

आयसीएआरने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आजवर 22 कोटी 19 लाख 68 हजार 271 नमूने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 5 लाख 37 हजार 764 चाचण्या रविवारी (दि. 07) रोजी करण्यात आल्या आहेत.

गेल्या 24 तासांत देशात 97 रुग्णांचा मृत्यू झाला असून, देशातील मृतांची संख्या 1 लाख 57 हजार 853 एवढी झाली आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.41 टक्के एवढा आहे‌. रिकव्हरी रेट 97.07 टक्क्यांवर पोहोचला आहे. सध्या देशात 1 लाख 88 हजार 747 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.