Bicycle Ride : पुणे ते शिवनेरी 275 सायकलस्वारांनी केली 200 किमीची राईड

एमपीसी न्यूज – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त इंडो अथलेटिक्स सोसायटीतर्फे पुणे ते शिवनेरी असे 200 किमीच्या सायकल राईडचे शनिवारी (दि.27) आयोजन करण्यात आले होते.ज्यामध्ये 275 जण सहभागी झाले होते.  

नाशिक फाटा येथून शनिवारी सकाळी सहा वाजता उद्योजक अन्नारे बिरादार, एमआयडीसी अधिकारी प्रकाश शेडबाळे त्याचप्रमाणे आयएएसचे गजानन खैरे, अजित पाटील, गणेश भुजबळ यांच्यातर्फे झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली.पुणे ते शिवनेरी सायकल मार्ग – नाशिक फाटा – राजगुरुनगर – मंचर – नारायणगाव – शिवनेरी. असा होता. अष्टविनायकामधील लेण्याद्री करून सर्व साईकलिस्ट ओझर येथे मुक्कामासाठी गेले आणि दुसऱ्या दिवशी याच मार्गावरून परतीचा प्रवास संपन्न झाला, असे आय ए एस शिवनेरी सायकल राईडचे प्रमुख श्रेयस पाटील आणि अजित गोरे यांनी सांगितले

 

 

पुणे ते शिवनेरी या राईडचे तिसरे वर्ष आहे.पर्यावरण आणि आरोग्य या दोन्हींचा संदेश समाजामध्ये देत सदर सायकल स्वारी मार्गक्रमण करते.एका दिवसामध्ये तब्बल 100 किलोमीटर अंतर पाच ते सहा तासांमध्ये पार केले.

तसेच राजगुरुनगर येथे हुतात्मा राजगुरु सायकल क्लब, मंचर येथे साई प्रिंटर्सतर्फे अल्पोपहार आयोजन, नारायणगाव येथे साई संस्थान व शिवनेरी ॲथलेटिक असोसिएशनतर्फे स्वागत करण्यात आले.श्रीराज हॉटेलतर्फे सर्वांना मसाला दूध वाटप करण्यात आले.

या राईडच्या नियोजनामध्ये कैलास तापकीर, गिरीराज उमरीकर, कपिल पाटील, अमित पवार, रमेश माने, कॅड कॅफे कॉर्नरचे संचालक भावेश वाघ, सुशील मोरे, श्रीकांत चौधरी, प्रतीक पवार आदींनी महत्त्वाची भूमिका बजावली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.