India Corona Update : देशात 35 कोटी चाचण्या पूर्ण, गेल्या 24 तासांत 1.32 लाख नवे रुग्ण 

एमपीसी न्यूज – देशात कोरोना चाचण्यांची संख्या वाढली आहे‌. दररोज 20 लाखांहून अधिक नमूने तपासले जात आहेत. देशात 35 कोटी चाचण्या पूर्ण झाल्या आहेत तर, गेल्या 24 तासांत 20 लाख 19 हजार 773 नमूने तपासण्यात आले आहेत. आयसीएमआरने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. 

गेल्या चोवीस तासांत देशभरात 1 लाख 32 हजार 788 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यासह देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 कोटी 83 लाख 07 हजार 832 एवढी झाली आहे. त्यापैकी 2 कोटी 61 लाख 79 हजार 085 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. गेल्या 24 देशात तासांत 2 लाख 31 हजार 456 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

देशात सक्रिय रुग्णांच्या संख्येत निरंतर घट होत असून, देशात सध्याच्या घडीला 17 लाख 93 हजार 645 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशाचा रिकव्हरी रेट 92.48 टक्के एवढा झाला आहे. देशातील कोरोना मृतांची संख्या 3 लाख 35 हजार 102 वर पोहोचली आहे. मागील 24 तासांत देशभरात 3 हजार 207 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. देशाचा मृत्यूदर 1.18 टक्के एवढा झाला आहे..,,

देशात कोरोना लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत देशात 21 कोटी 85 लाख 46 हजार 667 जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे. त्यापैकी 17 कोटी 32 लाख 39 हजार 527 जणांना पहिला डोस देण्यात आला आहे तर, 4 कोटी 51 लाख 19 हजार 064 जणांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.