India Corona Update : चोवीस तासांत 7,554 कोरोना रुग्णांची नोंद, 223 मृत्यू 

एमपीसी न्यूज – भारतातील कोरोना संसर्गाचा वेग मंदावला आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 7 हजार 554 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, 223 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. चोवीस तासांत 14 हजार 123 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

सध्याच्या घडीला देशात 85 हजार 680 ॲक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, आजवर देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी 4 कोटी 23 लाख 68 हजार 673 रूग्ण यशस्वी उपचारानंतर बरे झाले आहेत. देशाचा रिकव्हरी रेट वाढून 98.60 टक्के एवढा झाला आहे.

आजवर 5 लाख 14 हजार 246 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. देशाचा मृत्यूदर 1.20 टक्के एवढा झाला आहे. ICMR च्या आकडेवारी नुसार आजवर 76.91 कोटी प्रयोगशाळा नमुने तपासण्यात आले आहेत. गेल्या 24 तासांत 7.81 नमूने तपासण्यात आले आहेत.

देशात कोरोना लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आजवर 177 कोटी 79 लाख 92 हजार 977 जणांना लस टोचण्यात आली आहे. गेल्या 24 तासांत 8 लाख 55 हजार 862 जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.