India Corona Update : चोवीस तासांत 8,013 कोरोना रुग्णांची नोंद, 16,765 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – गेल्या 24 तासांत देशभरात 8 हजार 013 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, 16 हजार 765 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या कमी झाली आहे. सध्या 1.02 लाख ॲक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पॉझिटिव्हीटी रेट 1.11 टक्के एवढा खाली आलाय. 

आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रूग्णांची संख्या 4 कोटी 29 लाख 24 हजार 130 एवढी झाली आहे. त्यापैकी 4 कोटी 23 लाख 07 हजार 686 रूग्ण यशस्वी उपचारानंतर बरे झाले आहेत. देशाचा रिकव्हरी रेट वाढून 98.56 टक्के एवढा झाला आहे.

गेल्या 24 तासांत देशभरात 119 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजवर 5 लाख 13 हजार 843 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. देशाचा मृत्यूदर 1.19 टक्के एवढा झाला आहे.

ICMR च्या आकडेवारी नुसार आजवर 76.74 कोटी प्रयोगशाळा नमुने तपासण्यात आले आहेत. गेल्या 24 तासांत 7.23 नमूने तपासण्यात आले आहेत. देशात कोरोना लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आजवर 177 कोटी 58 लाख 86 हजार 335 जणांना लस टोचण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.